वटवृक्ष
कधीचा तीथे आहे उभा जीर्ण वटवृक्ष, युगांच्या स्मृतींचा असे संकीर्ण वटवृक्ष. रेचीत काळासही शाखा-उपशाखांनी, भू-वरील सम्राट जणु आकीर्ण #वटवृक्ष. सत्यवान सावित्रीच्या प्रेमाचा साक्षी, साक्ष ती स्मरण्यात उत्तीर्ण वटवृक्ष. नवयुगाच्या नवनिष्ठांनी न जाणे कधी, ह्रदयी होत असे का विदीर्ण वटवृ़क्ष.