पोस्ट्स

सप्टेंबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

“प्रीथर्मल डिसक्रीट टाइम क्रिस्टल्स (डीटीसी)”

 केंब्रिज विद्यापीठाचे काही संशोधक संगणक मॉडेलिंगचा वापर करून “प्रीथर्मल डिसक्रीट टाइम क्रिस्टल्स (डीटीसी)” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदार्थांच्या संभाव्य नवीन स्थितींचा अभ्यास करत आहेत.  अातापर्यंतच्या मान्यतेनुसार प्रीथर्मल डीटीसीचे गुणधर्म क्वांटम फिजिक्सवर अवलंबून आहेत. क्वांटम फिजिक्स ‘सबॲटाॅमीक स्केल’वर अर्थात अणूच्या आतमधे असणाऱ्या मुलभूत कणांविषयीच्या नियमांबद्दल सांगत असते. क्वांटम फिजिक्स ही भौतिकशास्त्राची एक अत्याधीक रुचीपूर्ण पण जटील आणि प्रगतीच्या मार्गावरची शाखा आहे. पण काही संशोधकांना असे आढळले की या प्रगत शाखेपेक्षा कदाचीत मुलभूत (बेसिक) भौतिकशास्त्रावर आधारित एखादा सोपा दृष्टिकोन या प्रीथर्मल डिसक्रीट टाइम क्रिस्टल्स (डीटीसी) संबंधीत रहस्यमय घटना समजून घेण्यासाठी अधीक चांगल्या प्रकारे वापरला जाऊ शकतो.  डीटीसी अत्यंत जटिल भौतिक प्रणाली आहेत आणि त्यांच्या असामान्य गुणधर्मांबद्दल अजून बरेच काही समजणे व शिकणे बाकी आहे.  जसा एखादा स्टॅंडर्ड स्पेस क्रिस्टल एक स्पेस-ट्रान्सलेशनल सिमेट्री मोडू शकतो कारण त्याची रचना अवकाशात सर्वत्र सारखी नसते तर वेगवेगळी असते....

कालही अन् आजही!

  आकंठ तुझ्या मी प्रेमात ...   कालही अन् आजही तू तुझ्याच नादात कालही अन् आजही! ध्यान तुझे ध्येयात कालही अन् आजही. अडचण माझी वेगात, कालही अन् आजही! होउन ज़रा मोकळा, बघ एकदा डोळ्यात, तुझीच वाट पाहतात, कालही अन् आजही! #मराठी

त्याच्या आयुष्यातला एक दिवस

त्याच्या आयुष्यातला एक दिवस    रोज सकाळी न चुकता लौकर मी उठतो पहा, म्हणते बायको वेडी माझी, उठा आता वाजले दहा! तरतरी यायला काय हो लागते? आठ कप एवढाच चहा, आॅफीसातून तोवर फोन येतो, “आज तुम्ही घरीच रहा” तरिही कंटाळा न करता  जातो आॅफीसला नेमाने, सगळ्या महिला ग्राहकांशी बोलतो अगदी प्रेमाने! कधी नुकसान होते का, जास्ती केलेल्या कामाने? तरिही सहकारी सतत सांगतात, ‘हळू जरा दमाने!’ आॅफीसच्या कामात आहे मी अतिशय काटेकोर, ठेवत नाही मुलाहीजा, कोणी असो लहान-थोर! क्वचित कधी मग बाॅस डाफरतो, ‘मत मचाओ इतना शोर’ त्याला काय समजते हो, तो तर आहे कालचा पोर! काम माझे शिस्तीत असते, करत नाही कंटाळा, काम करतो म्हटल्यावर, व्हायचाच एखादा घोटाळा! निस्तरतो माझे मी सारे, हजार कागदांशी करुन चाळा, लोक आवर्जुन विचारतात मला, “कोणती होती तुमची शाळा’! घरी यायला निघताना  घड्याळ दाखवते साडेअकरा, खाटीक वाॅचमन बघतो असा, जणू मी त्याचा बकरा! “रोजचाच कसला उशिर हा?” बायको नेहमी करते नखरा! आई म्हणते “थकलास रे, जरा आराम कर पाखरा!” तापट असली बायको तरी, जेवण करते रुचकर फार, जेवता जेवता बाबा सांगतात, समजुतीच्या गोष्टी च...

आयुष्याच्या पुस्तकात..

इमेज
 

पीएच् डी. तर माझी पॅशन!

  पीएच् डी. तर माझी पॅशन! काॅंपिटीशन होती टाईट, तरी एंट्रन्स ची देऊन फाईट, मिळवलेच मी ॲडमीशन, पीएच् डी. तर माझी पॅशन! डोळे बारीक पण चष्मा जाड, गाईडच्या समोर कागदांचे बाड मग सुरु “टाॅपिक डीस्कशन”, पीएच् डी. तर माझी पॅशन! गोळा करताना रेफरन्सेस, कामातून गेले सारे सेन्सेस, “व्हेअर ईज युवर काॅन्सट्रेशन?” पीएच् डी. तर माझी पॅशन! सिनाॅप्सीस तयार करता, सहा महिने त्यात सरता, “लेट्स चेंज दि डायरेक्शन” पीएच् डी. तर माझी पॅशन! नविन दिशा नविन शोध, होईना कसलाच बोध, “मेक फास्ट युवर ॲक्शन!” पीएच् डी. तर माझी पॅशन! शेवटी सिनाॅप्सीस तयार झाला, कमिटीनेही मंजुर केला, जरा मनाला रिलॅक्सेशन, पीएच् डी. तर माझी पॅशन! चंचल राशी माझी कर्क, पार पडेना कोर्स वर्क, तिनदा झाले रिपीटेशन, पीएच् डी. तर माझी पॅशन! खूप होती एक्साईटमेंट, सुरु केले एक्परीमेंट, रिझल्ट मिळवणे हेच मिशन, पीएच् डी. तर माझी पॅशन! बरेच अंक अनेक आकडे, ग्राफ तिकडे आम्ही इकडे, “नाऊ गो फाॅर पब्लिकेशन” पीएच् डी. तर माझी पॅशन! रिसर्च पेपरशी घेता टक्कर, गरगर डोके येई चक्कर, आॅलमोस्ट सगळेच कन्फ्युजन, पीएच् डी. तर माझी पॅशन! पेपर कसातरी झाला पब्लीश, बे...

एडमंड फिशर

 अनेक व्यक्ती आपल्या आयुष्यात महान कार्ये, लेखन, संशोधन  करतात, पण त्या कार्यांचे याची देही याची डोळा योग्य ते श्रेय किंवा सार्थक झालेले पाहायला ते असत नाहीत. मेंडेल पासुन अनेक शास्त्रज्ञांची अशी उदाहरणे देता येतील. संशोधक शास्त्रज्ञ एडमंड फिशर त्यांच्या १०१ वर्षाच्या सुदैवी आयुष्यात त्यांनी केलेल्या शोधाचा वैद्यकशास्त्र आणि पर्यायने मानवी जीवनास झालेल्या अनमोल योगदानाचे आणी लाभाचे  साक्षीदार ठरले. त्यांच्या शोधामुळे आजवर लाखो लोकांचे जीव वाचले आहेत. सन १९२० मधे फ्रेंच आई आणि आॅस्ट्रीयन वडीलांच्या पोटी चिन मधे जन्मलेले- प्रथम ईटली नंतर स्वीस आणि शेवटी अमेरिकन नागरिकत्व घेतलेले एडमंड फिशर नुकतेच १०१ वर्षांचे होऊन मृत्यु पावले. एडमंड फिशर यांनी पेशींमधील रिव्हर्सीबल प्रोटीन फॉस्फोरायलेशनचे पहिले उदाहरण शोधले. ही प्रक्रिया पेशींच्या जीवनकार्यांचे बहुतांशी पैलू नियंत्रित करते. पेशींमधील सर्व जैवरासायनीक अभिक्रीयांसाठी एन्झाइम आवश्यक असतात. या एन्झाइमचे मुख्य दोन वर्ग-, प्रोटीन कायनेज आणि प्रोटीन फॉस्फेटेज ज्ञात आहेत. ही एन्जाइम प्रोटीन आणि फॉस्फेट यांना अनुक्रमे ‘संलग्न करणे’...

अलीकडील काळातले अवकाश संशोधनातील महत्वाचे शोध

 अलीकडील काळातले अवकाश संशोधनातील महत्वाचे शोध १) ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी 6397 च्या मध्यभागी शास्त्रज्ञांना एकाच मोठ्या कृष्णविवराच्या अस्तीत्वाची शक्यता दिसत होती. पण हबल ने दाखवले की तीथे मध्यभागीच एका मोठ्या कृष्णविवराऐवजी ऐवजी अनेक लहान लहान कृष्णविवरे दाटीवाटीने  एकत्रीत सहअस्तीत्वात आहेत.  या शोधानंतर खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचीत या दाटीवाटीने बसलेल्या लहान लहान कृष्णविवरांचे या गोलाकार क्लस्टर्समध्ये विलीनीकरण हे गुरुत्वाकर्षण लहरींचा एक महत्त्वाचा स्त्रोत असू शकतो, स्पेसटाइममधूनही लहरी बनू शकतात. अलीकडील काळातला कृष्णविवरांशी संबंधीत हा सर्वाधीक  महत्वाचा शोध समजला जातो. २) दोन आकाशगंगांचे एकमेकीशी विलीनीकरण झाल्यावर त्यांच्या मध्यावरच्या कृष्णविवरांचे काय होते याचे अनेक अभ्यास झाले आहेत, परंतु तीन आकाशगंगा एकत्र आल्यावर कृष्णविवरांचे काय होते हे पद्धतशीरपणे पाहणारे हे अलीकडचे महत्वाचे आणि पहिलेच संशोधन - एकुण सात वेळा तिन आकाशगंगांचे होणारे विलीनीकरण निरिक्षणात आले आहे. या सात तिहेरी विलीनिकरणानंतर _एकच मोठे वाढणारे कृष्णविवर एका ठिकाणी आढळले. _चार ठीका...

आनंदी अथवा सार्थक आयुष्य

               जीवनाची परिपूर्णता किंवा आनंदी अथवा सार्थक आयुष्य जगणे म्हणजे काय हे सामान्यांपासुन असामान्यांपर्यंत आणि अडाण्यांपासुन अभ्यासकांपर्यंत अनेकजण शोधत असतात. काहीजण जाणीवपूर्वक तर काहींचा शोध त्यांच्या स्वत:च्याच नकळत सुरु असतो. मानवाचा आनंद आणि हित, तसेच मानवी कल्याण व उत्कर्षासंबंधी अभ्यास करणाऱे मानसशास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून सांगतात की ज्याला एक “उत्तम किंवा चांगले जीवन" म्हणता येईल ते दोन पैकी एका मार्गाने जगता येते (किंवा ते तसे बनवता येते). पहिला —  आनंदमार्ग: (Happiness) याच्या नावाप्रमाणेच या आयुष्यात आनंद, काही आराम आणि बरीच सुरक्षितता यांनी भरलेले असतात.  सरधोपट चौकटीत जगणारे बिकट वाट वहिवाट न चोखाळणारे या मार्गाने आपल्यापरीने अंती ज्याला सुखी समाधानी म्हणता येईल असे आयुष्य जगतात. दुसरा आहे _अर्थवाही मार्ग: (Meaning) आयुष्यात जगण्याचा अर्थ शोधत, हेतू आणि काही सुसंगत वा विसंगत क्रम यासह असणारे आयुष्य.  अनेकदा कोणत्याही संपत्ती, विश्रांती वा सुरक्षितता यांचा विचार न करता जीथे अर्थ वाटतो तीथे झोकून देणारे आयुष्य ...

माहित नाही!

  निघेल का कपड्यांवरचा धुरळा उद्या?   माहित नाही!  सरळ्याला भेटेल का कोणी सरळा उद्या?   माहित नाही! आजच्या दिवसाची क्षमा आजच मागावी हे बरे, उघडेल का नक्की सकाळी डोळा उद्या?  माहित नाही!