आनंदी अथवा सार्थक आयुष्य

               जीवनाची परिपूर्णता किंवा आनंदी अथवा सार्थक आयुष्य जगणे म्हणजे काय हे सामान्यांपासुन असामान्यांपर्यंत आणि अडाण्यांपासुन अभ्यासकांपर्यंत अनेकजण शोधत असतात. काहीजण जाणीवपूर्वक तर काहींचा शोध त्यांच्या स्वत:च्याच नकळत सुरु असतो. मानवाचा आनंद आणि हित, तसेच मानवी कल्याण व उत्कर्षासंबंधी अभ्यास करणाऱे मानसशास्त्रज्ञ बऱ्याच काळापासून सांगतात की ज्याला एक “उत्तम किंवा चांगले जीवन" म्हणता येईल ते दोन पैकी एका मार्गाने जगता येते (किंवा ते तसे बनवता येते).

पहिला — 

आनंदमार्ग: (Happiness) याच्या नावाप्रमाणेच या आयुष्यात आनंद, काही आराम आणि बरीच सुरक्षितता यांनी भरलेले असतात. 

सरधोपट चौकटीत जगणारे बिकट वाट वहिवाट न चोखाळणारे या मार्गाने आपल्यापरीने अंती ज्याला सुखी समाधानी म्हणता येईल असे आयुष्य जगतात.

दुसरा आहे

_अर्थवाही मार्ग: (Meaning) आयुष्यात जगण्याचा अर्थ शोधत, हेतू आणि काही सुसंगत वा विसंगत क्रम यासह असणारे आयुष्य. 

अनेकदा कोणत्याही संपत्ती, विश्रांती वा सुरक्षितता यांचा विचार न करता जीथे अर्थ वाटतो तीथे झोकून देणारे आयुष्य जगावेसे वाटणारे लोक इथे धडपडत असतात.

        आतापर्यंत, मानसशास्त्रज्ञांनी या दोन्हीवर आणि या दोन्हींच्या द्वंद्वावरही काम केले आहे.  (द्वंद्व यासाठी कारण आपल्यातील अनेकांना एकाच वेळी साहसी पण  सुरक्षित आयुष्य हवे असते. आणि ते नाविन्याने भरलेले हवे पण त्या नाविन्याचे अंदाज बांधायला सोपे असे काहीसे आयुष्य हवे असते.)

“जीवन-कल्याणाचे द्विगुणित प्रारुप (model)” सादर करणारे मानसशास्त्रज्ञ शिगेहिरो ओशी यांच्या मते, आनंद आणि अर्थ हे दोन मार्ग एकमेकांना समांतर असु शकतात किंवा काही वेळा एकमेकांना छेदूही शकतात.

दोन्ही संकल्पना मुख्यत्वे वैयक्तिक आणि सामाजिक स्थैर्याशी संबंधीत आहेत.

गेल्या सहा वर्षांपासून, चार्लोट्सविले मधील व्हर्जिनिया विद्यापीठातील ओशी आणि त्यांचे सहकारी चांगल्या किंवा उत्तम जीवनाचा आनंद आणि अर्थ यानंतरचा तिसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न/अभ्यास करत आहेत. त्यांच्या प्रयत्न व अभ्यासाच्या निष्कर्षानुसार त्यांच्या मते  "मानसिक समृद्धी" हा तो तिसरा मार्ग आहे.  

त्यांचे संशोधन की समृद्ध जीवनाचे घटक जीवनातील चांगली परिस्थिती किंवा स्वभावातील वा मानसिक  स्थैर्याद्वारे येत नाहीत.  त्याऐवजी, समृद्ध जीवनाचा मार्ग नाविन्य शोधणे, कुतूहल बाळगणे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या क्षणांमधून उद्भवतो.

जीवनाला समृद्ध बनवणारे अनुभव स्वाभाविकपणे चांगले किंवा वाईट नसतात;  ते कधी अपघाती, कधी आनंदी किंवा प्रसंगी क्लेशकारक सुद्धा असू शकतात.

पण महत्वाचे म्हणजे हे अनुभव सजगपणे घेणे हा समृद्ध जीवनाचा तिसरा मार्ग म्हणून पुढे येत आहे.



टिप्पण्या

  1. मानसिक समृद्धीचा मार्ग मला योग्य वाटतो. तो अधिक आव्हानात्मक आहे. आपल्या सुरक्षा कवचातून बाहेर आपले क्षितीज विस्तारायचा प्रयत्न करत आपण पुढे जात राहू.पण तरीही प्रत्येक वेळी आपण पहिल्या दोन मार्गाचा विचार करत राहू. कारण आनंद ही आपली गरज आहे.म्हणून मानसिक समृद्धीचा मार्ग धोकादायक आहे जर आपल्या व्यतिरिक्त इतरांना नुकसान होत असेल तर .पण इतर कोणालाही हरकत नसेल तर आपण पुढे जाऊ शकतो.पण ह्या साठी अफाट धैर्य आणि सहनशीलता ह्यांची गरज आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. असे माणसं शास्त्रज्ञ म्हणतात...
    मला वाटतं वर्गीकृत करण जटिल आहे...
    मानवी मेंदू प्रमाणे

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट