चारोळी लोकांशी होतच राहतात, ओळख, गप्पा, भेट. स्वतःची स्वतःशीच कधी ना घडते गाठभेट! ******************** चारोळी ग्रिष्माचा असो वणवा, की शिशिराचा शित कहर, प्रेमाच्या वावरात सदा ऋतु वसंताचा बहर! ****************** चारोळी तुझी मी होऊन तरी काय आता होणार? संपले अश्रु सारे आता कसली मी रडणार? **************** चारोळी प्रेम म्हणजे एक असे मुक्काम, ज्याचा कोणताच पत्ता नाही! तो प्रेमी म्हणजे गुलाम असा, ज्यावर कोणाची सत्ता नाही! ******************** चारोळी वाटले ना कधी, भेटतील असे क्षण… अदृश्य अश्रु तरी, मनी आक्रंद रुदन **************** फुले कसा उधळती नि:स्वार्थी, त्यांचा गंधकोष माहित नाही. सारे काही घेणाऱ्या मानवाला “देण्याचा संतोष” माहित नाही. ********************* समजावे ज्यांना अंती आधाराची काठी, ते संधी साधुन घालती खंजीर का पाठी? गेले सरुनी कष्टात तारुण्य आणि शक्ती, काही न उरले हाती, फक्त पोचली साठी! ********************* स्वतःच स्वतःशी भांडुन, स्वतःचाच घालवायचा भाव! मीच तो महासागर, ज्यात समाधिस्थ माझी नाव! ****************** ...