पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ध्यास

इमेज
 ध्यास नसे प्राप्तीची आस प्रेमास माझ्या, परी ध्यास तुझा अंतरास माझ्या, अनुरक्त ह्रदय दाटे आरक्त नेत्री, अजुनी का उमगेना प्रियकरास माझ्या!? आठवण येता तुझी जराशी, अंतरात होते आरास माझ्या, हूल तुझी चाहुल देते पण, ऊरात फुलते फुलरास माझ्या! तूच भेटसी शब्द होऊनी कंठातील गद् गद् स्वरास माझ्या, दे ओलावा अन् मृद् गंध जरा सुकल्या पाऊसधारास माझ्या! दे कधी धुंद तो गंध श्वासांचा, तुळशीच्या मंजीरांस माझ्या, पाहु दे विराण अंगणास या, एकदा जिवलग यारास माझ्या! प्राण जरी गेला तरी, दिसेल कलेवर दारास माझ्या, तुझीच प्रतिक्षा माझ्यानंतर, असेल मोकळ्या घरास माझ्या! भाग्यश्री

Promise

इमेज
Hi...  Here is a collection of some meaningful, beautiful, and weird but real quotes on "promise" by some great personalities and some of my introductory comments in between. I promise, its worth reading! Promises are always an assurance about the future, a future which nobody has yet predicted. "Promises are the uniquely human way of ordering the future, making it predictable and reliable to the extent that this is humanly possible."      Hannah Arendt Be sure, the person who is promising you something is aware and in full control of his/her all senses. You can't trust a promise someone makes while they're drunk, in love, hungry, or running for office.      Joe Moore Some promises, given by your heart are much more pious and you will keep them without any obligation from anyone- come what may!  There are certain promises you make that are more sacred than anything that happens in a court of law, I don't care how many Bibles you put your...

अस्वलाची अस्सल गोष्ट

इमेज
  अस्वलाची अस्सल गोष्ट     सुमारे ११०,००० वर्षांपूर्वी, (सध्याच्या फ्रान्स मधे राहणाऱ्या) निॲंडरथल मानव शिकारींनी एकत्रीत केलेल्या  मोठ्या तपकिरी अस्वलांची (आता नामशेष झालेल्या) कवटी व हाडे सापडली आहेत. अंदाज असा आहे की काही हजार वर्षे तरी पूजा-परंपरा वा काही मृत्यु संबंधीत रिवाज म्हणून  निॲंडरथल मानवासाठी अस्वल महत्वाचे होते.      अस्वलाच्या निॲंडरथल पासुन आजच्या प्रवासादरम्यान मध्ययुगीन काळात साहित्यातही प्रवेश झाला. मध्ययुगीन कथांमध्ये ब्रुईन अस्वल ही एक लोकप्रिय व्यक्तिरेखा होती. रशियामध्ये, लोकसाहित्यात असणारा अस्वल नंतर "मिश्का" नावाच्या एका व्यंगचित्रात विकसित झाला. रशियातील १९८० च्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान उर्वरित जगानेही मिश्काची स्पर्धेचा शुभंकर (mascot) या नात्याने भेट घेतली.       दरम्यान टेडी बिअर, विनी-द-पूह, पॅडिंग्टन बिअर, बिग टेडी आणि लिटल टेडी (एचसी क्रॅडॉक यांच्या कथांच्या सेटमधील पात्र), योगी आणि बू-बूअर, स्मोकी आणि  फोझी अस्वल हे सर्व अस्वल राज्यातील मित्र आणि त्यांची बनवलेली खेळणी लहान मुला...

चाॅकलेट

इमेज
चाॅकलेट             प्राचीन मेक्सिकन लोकांचा विश्वास होता की ज्यापासुन चाॅकलेट बनते ते कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे. त्यासोबत असेही सांगितले जाते की केवळ देवांसाठीच्या या कोको बिया वा चाॅकलेटची  मानवाला माहिती करुन दिल्याने इतर देवता क्वेत्झलकोएटल वर नाराज झाल्या होत्या.  अशा या देवप्रिय चाॅकलेटविषयी या धाग्यात काही शास्त्रीस व इतर रुचीपूर्ण माहिती देत आहे. मिथके व इतिहास     मेसोअमेरिकामध्ये (उत्तर अमेरिकेतील मध्य मेक्सिको ते कोस्टारिका हा सासंकृतीक भाग) चॉकलेटचा या क्षणी मानवाला ज्ञात असलेला इतिहास सुरू होतो. चॉकलेटपासून बनविलेली किण्वित पेये इ.सन पूर्व ४५० वर्षांपूर्वी वापरली जायची असे पुरावे आढळलेले आहेत.   अझ्टेक संस्कृती मधे पती-पत्नीमधील होणाऱ्या मिलनाचा पूर्वसंकेत म्हणून विवाहसोहळ्यात  कोकाे बियाणे वापरली जात होती असे इतिहासकार सांगतात.     कोको बियाणे शहाणपणाचा देव क्वेत्झलकोएटलची देणगी आहे या मान्यतेमुळे त्या बियाण्याला एकदा इतके मूल्य प्राप्त झाले की ते एखाद्या चलन...

थांब जोडीदारा...

इमेज
  थांब जोडीदारा...  (प्राणीजगतातील काही प्रणयाराधनेचे प्रस्ताव)        मानवच नाही तर इतरही प्राण्यांतही आपल्या जोडीदाराची निवड करण्याची प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक आणि वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. प्राणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रस्ताव आपल्याला आवडलेल्या जोडीदारासमोर ठेवतात. नैसर्गिक निवड प्रक्रियेचा ’ परिपाक असलेली ही जोडीदार निवडण्याची प्रक्रिया ‘आपली भविष्यातील संतती उत्तम प्रतिची   कशी बनेल आणि जीवंत राहण्याच्या नैसर्गिक संघर्षात इतर सजातीय स्पर्धकांना तुल्यबळ कशी ठरेल ’ या निकषांवर केली जाते. जोडीदार निवडीची प्रक्रिया जेंव्हा नर व मादी हा फरक   सजीवांमधे उत्क्रांतीकाळात निर्माण झाला तेंव्हापासुनची आहे. नराच्या शुक्राणुंसाठी आवश्यक उर्जेच्या तुलनेत मादी आपल्या बिजामधे अधिक प्रमाणात उर्जेची गुंतवणूक करत असल्याने नराच्या तुलनेत मादी जोडीदार निवड करताना अधिक सजग असते. आपल्या मानवी जगातील डेटींग पेक्षाही प्राणी जगतातील प्रणयाराधनेच्या पद्धती अनेक प्रकारे वैविध्यपूर्ण आणि आश्चर्यकारकही आहेत. यापैकीच काही....     ...

गुलाब-

इमेज
  गुलाब- मेसोपोटेमीया, युनान-रोम, येथील संस्कृती असोत, वा बाबर, नुरजहाॅं, नेपोलीयन, पं. जवाहरलाल नेहरु असे राज्यकर्ते असोत, अथवा विरसिंग, शेक्सपियर सारखे साहित्यीक - या सर्वांची आणि सर्वसामान्यांची गुलाबाची आवड सर्वश्रुत आहे.  आज या धाग्यात गुलाबाविषयी काही स्फुट- रोमन लोक आपल्या भोजन-कक्षाचे  छत गुलाबाच्या फुलांनी सजवत असत.  त्यापाठीमागे त्यांची अशी मान्यता होती की भोजनास आलेल्या अतिथींनी गुलाब पाहुन हे लक्षात ठेवावे की भोजनादरम्यान यजमानासह केलेल्या वार्तालापाची वाच्यता बाहेर करु नये. “गुलाबाच्या खाली” जे काही असेल ते ‘गुप्त’ असे समजले जात असे.  एक अरबी गुलाबी सुरस कथा अशी आहे की-  सर्वच गुलाबांचा रंग पूर्वी पांढरा होता. पण  एका रात्री एका बुलबुलची भेट गुलाबाशी झाली आणि बुलबुल प्रेमाच्या रंगात रंगुन गेली. त्या भेटीनंतर बुलबुल चा आवाज़ सुरेल सुरमई झाला. एकदा अचानक गुलाबाचा एक काटा बुलबुलच्या ह्रदयात लागला. त्या लाल रक्तवर्णाला पाहुन त्यानंतर मात्र पांढरा शुभ्र असणारा  गुलाब लाल-गुलाब झाला. सुरस कथा सोडून प्रत्यक्ष जीवनाकडे पाहता- दक्षिण सायबेरिया...