पोस्ट्स

मे, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

प्रेमाची शेड

 प्रेमाची शेड फेंट पिंक आहे की, आहे डार्क रेड  तुझ्या माझ्या प्रेमाची कोणती आहे शेड?  एवढं खरं की ते आहे हेवनली मेड,  कधीच नव्हते ते ‘मीन्ट फाॅर बेड’! ज्या दिवशी कमवेन मी माझी ब्रेड, सगळ्या जगाला कळेल माझी ग्रेड!  तुझे बाबा तुला म्हणतील ‘बेटा गो अहेड,  काळजी करू नकोस मी सर्व करीन पेड’ सगळे प्रॉब्लेम्स मग होतील डेड,  अडचणी संपतील ए टू झेड,  एकमेकात गुंफून सुखाचे थ्रेड, जगु आनंदाने जगी प्रेम करीत स्प्रेड!

म्युकोर्मायकाॅसीस

  कोविड-१९ च्या आधीही भारत हा म्युकर (फंगस-बुरशी) चे जगातील ७०% (सर्वाधीक) रुग्ण असणारा देश म्हणून माहित होता. सध्या म्युकोर्मायकॉसीस रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे काय कारणे असावीत याचा संक्षीप्त आढावा १.भारतात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असणे. २. मधुमेही रुग्णांचे व्यवस्थापन निट नसणे- उदा. योग्य अंतराने सातत्याने साखरेचे प्रमाण तपासणे व आजार नियंत्रणात राहण्यासाठीची आवश्यक काळजी घेणे २. स्टिरॉईडस् चा मोठ्या प्रमाणात अव्यवहार्य वापर असणे ज्यामधे संसर्गाच्या सुरुवातीच्याच काळात स्टीराॅईड्स वापरणे, अधीक मात्रेत वापरणे आणि अधीक काळ वापरणे यांचा समावेश होतो. ३ स्टिरॉईडस् च्या बरोबरीने इम्युनोमांड्युलेटर्स प्रकारच्या औषधांचा उदा. Tocilizumab वापर करणे. ४. प्रतिजैविकांचा उदा. अझीथ्रोमायसीन अतीरिक्त वापर करणे, ज्यामुळे सरसकट सामान्यतः आढळणारे जीवाणूही नष्ट होतात. ५. B.1.617 या प्रकारातील विषाणू रोगप्रतिकारक शक्ती कमी करताना आढळतात. ६. अनेक रुग्णांना वैद्यकिय प्रकारच्या आॅक्सीजनऐवजी औद्यागिक वापराकरीता असणारा आॅक्सीजन देण्यात आला आहे. ७. हाॅस्पीटल्स मधील अनियंत्रीत गर्दी, ...

कोविड-१९ सौम्य संसर्ग व प्रतिपिंडे

 मानवी इम्यून सिस्टम किंवा रोगप्रतिरोधक संस्था  सौम्य प्रमाणात झालेला कोविड-१९ संसर्ग लौकर विसरू शकत नाही असे आढळले आहे. सौम्य कोविड १९ संसर्गानंतरही अनेक महिन्यांनंतर जेव्हा रक्तातील प्रतिपिंडे (antibodies) यांची पातळी कमी झालेली असते तेव्हांही अस्थिमज्जामधील (bone marrow)  रोगप्रतिकारक पेशी कोरोनाव्हायरस विरूद्ध नवीन प्रतिपिंडे निर्माण करुन देण्यास तयार व सक्षम असतात. मुलत: अल्पायु असणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी संसर्ग झाल्यानंतर, शरिराचे संरक्षण करणारी प्रतिपिंडे वेगाने तयार करतात. या अल्पायुषी रोगप्रतिकारक पेशी नष्ट झाल्यानंतर, प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होते. परंतु या रोगप्रतिकारक पेशींचा एक समूह दीर्घकाल जगणारा असतो, ज्यांना प्लाझ्मा पेशी म्हटले जाते. या प्लास्मा पेशी पहिला संसर्ग नष्ट झाल्यानंतरसुद्धा प्रतिपिंडे तयार करण्याची  राखीव क्षमता बाळगून असतात. अशा पेशींपैकी बहुतेक पेशी अस्थिमज्जा येथे स्थलांतर करतात. सौम्य कोविड-१९ च्या संसर्गानंतर सात महिन्यांनी १९ रुग्णांचे अस्थिमज्जाचे नमुने घेतले गेले. त्यापैकी १५ नमुन्यांमध्ये कोरोनाव्हायरसच्या विरूद्ध प्रतिपिंडे बनवू ...