पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
  असेही पाहिले काही, दिवस ते मंतरलेले. अशाही वाटा चाललो, जीथे काटे अंथरलेले. एकट्याचे नी काट्याचे, दु:ख होई दुहेरी! कायमचाच मुक्काम आता, वेदनांच्या माहेरी! न जाणे गेले कोठे, दिवस सारे सोनेरी. स्मृतींचीच साथ आता, वाट चालता काटेरी. एकट्याचे नी काट्याचे, दुःख होई दुहेरी, कायमचाच मुक्काम आता, वेदनांच्या माहेरी!!

स्फुट कविता

 वाट तुझी वहीवाटीची,  हा गाव तुझा आहे, पण चालतो ना इथे,  काही भाव तुझा आहे, मनासारखा कधी तो वाहवून तरी दाखव, ही नदी तुझी आहे,  हा प्रवाह तुझा आहे!

सांत्वन

 सांत्वनपर बोलताना आपण आपलेही दु:ख समोरच्याला सांगतो ते नेमके कशासाठी? त्याचे स्वत:चे दु:ख त्याने पेलावे म्हणून ते प्रोत्साहन असते? आपली दु:खे आपल्याला एकमेकांशी जोडायची असतात? आपल्या दु:खांची तुलना करायची असते?

स्फुट

 जुने फोटो, जुनी आठवण, मग पुन्हा नव्याने  जुन्या जखमेची नवी उसवण!

माहित नाही!

 निघेल का कपड्यांवरचा धुरळा उद्या?  माहित नाही! सरळ्याला भेटेल का कोणी सरळा उद्या?  माहित नाही! आजच्या दिवसाची क्षमाआजच मागावी हे बरे, उघडेल का नक्की सकाळी डोळा उद्या?  माहित नाही!

देणे- चारोळी

 फुले कसा उधळती नि:स्वार्थी  त्यांचा गंधकोष माहित नाही. सारे काही घेणाऱ्या मानवाला  “देण्याचा संतोष” माहित नाही.

लघु-कविता- संधी

 मान्य आहे माझा गुन्हा क्षम्य नाही तरी, एकदा तरी ऐक माझ्याच शब्दांत गोष्ट माझी… विश्वास ठेव किंवा नको पण एक संधी दे मला, सांगु दे मला कशी झाली माझ्यावर नियती रुष्ट माझी  लघु-कविता 

ओळख- स्फुट

 स्वत:ला तुम्ही किती स्पष्टपणे जाणता? तुमचे आनंद? तुमची दु:खे? तुमची स्वप्ने? तुमच्या आकांक्षा? तुमचे ध्येय? त्याचे मार्ग? अडथळे? तुमच्या क्षमता? तुमचे पर्याय? क्वचितच कोणी सुस्पष्टपणे स्वत:ला जाणून घेतो. पण आपण इतरांवर मात्र दे दणादण प्रतिक्रिया देत असतो.

#चारोळी

माझ्या प्रश्नांवर.... स्मित अधुरे शब्द अपूरे, ना ‘हो’, ना ‘नाही’ ही तुझी उत्तरे!