असेही पाहिले काही,

दिवस ते मंतरलेले.

अशाही वाटा चाललो,

जीथे काटे अंथरलेले.


एकट्याचे नी काट्याचे,

दु:ख होई दुहेरी!

कायमचाच मुक्काम आता,

वेदनांच्या माहेरी!


न जाणे गेले कोठे,

दिवस सारे सोनेरी.

स्मृतींचीच साथ आता,

वाट चालता काटेरी.


एकट्याचे नी काट्याचे,

दुःख होई दुहेरी,

कायमचाच मुक्काम आता,

वेदनांच्या माहेरी!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट