पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आधी आणी नंतर यातील अंतर

  आधी- मी तुझी होण्यास राजी सख्या, पण.. तुझ्या मनी माझी प्रिती असावी! नंतर- संसार आपला चालण्यासाठी, अन् तुझ्या मनी माझी भिती असावी!

प्रिती

  सोसावे तरी कसे कोणी, “प्रितीदेवीचे अत्याचार”! एका नवागताने करावी, जन्मांची नाती तडीपार. सहजची ती भंगावी, दीवास्वप्ने रंगलेली, प्रतिक्षा न त्यांची संपे, जी न हो कधी साकार जीव जीथे जडवावा, तीथे दु:खाचा परतावा. तरीही सुरुच राहतो, हा घाट्याचा व्यापार! भाग्यश्री

आयुष्य रे.....

  आयुष्य रे....: विशीत सौंदर्य... तर, तिशीत कर्तव्य! मग चाळीशीत धैर्य.... आणि, पन्नाशीत स्थैर्य! तोवर साठीत प्रत्यय.... की आता, सत्तरीत गंतव्य! संपले रे!

गर्जना

  गर्जना हाच ज्याच्या अस्तित्वाचा पुरावा, थांबला जर तो, समुद्र कसा ठरावा! पिंजऱ्याच्या छताला का स्वर्ग म्हणू लागला, हा गरुड ज्याच्या मालकीचा आसमंत असावा!

नाते

  हे नाते म्हणजे...  कधी कधी...मरता मरता ... जगण्याला दिलेले  आश्वासक वचन असते! आणि जगता जगता  अनेकदा असे निकट आलेले मरण असते!

मित्र

 नसतील सोबतीला  जर वारे वाहणारे, विझतील आगीचे  नखरे झेपावणारे! सगळे माझे सोबती मित्र आणि सोयरे प्रत्येक घडीला, बोलती ‘हो’ स होय रे! सर्वत्रही अन् सततही संगतीस असणारे  न जाणे गरजेवेळी  लपतात कोठे सारे!  झेपावू पाहता नभी, स्पर्षू पाहता तारे, माझ्या या ज्वालांना भेटतात विझवणारे!