प्रिती
सोसावे तरी कसे कोणी,
“प्रितीदेवीचे अत्याचार”!
एका नवागताने करावी,
जन्मांची नाती तडीपार.
सहजची ती भंगावी,
दीवास्वप्ने रंगलेली,
प्रतिक्षा न त्यांची संपे,
जी न हो कधी साकार
जीव जीथे जडवावा,
तीथे दु:खाचा परतावा.
तरीही सुरुच राहतो,
हा घाट्याचा व्यापार!
भाग्यश्री
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा