वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आंद्रे आगासीचे केस गळायला सुरूवात झाली. आपल्या कमी झालेल्या केसांची लाज वाटून ते लपवण्यासाठी आगासीने हेयरपीस घालायला सुरुवात केली. सन 1990 मध्ये 20 वर्षाचा असताना आगासीने त्याच्या पहिल्या ग्रँड स्लॅम, फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केला. केवळ स्पर्धेत नव्हे तर अंतिम फेरीत. एके ठिकाणी अगासीने लिहिले आहे, ‘अंतिम फेरी आधीच्या रात्री माझ्यावर जवळपास आभाळच कोसळले. अंघोळ करताना सगळेच केस हातात आल्यासारखे वाटले. त्याने त्याच्या भावाला बोलवले. भावाने जवळपास 20 बॉबी पीन वापरून त्याचा हेयरपीस कसा बसा जागेवर बसवला. आगासी पुढे लिहितो की 'अंतिम सामन्यापूर्वी वॉर्मअप करताना मी जिंकण्यासाठी प्रार्थना करत नव्हतो, तर माझ्या केसांना - हेयरपीस कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. माझ्या त्या शिल्लक केशरचनेने मला अतिशय भयभीत केले होते. मी अशी कल्पना करत होतो की, प्रत्येक वेळी माझे केस कोर्टवर-मातीवर पडत आहेत. सामना बघणारे लाखो लोक अचानक त्यांच्या टीव्ही च्या जवळ येत आहेत. एकमेकांकडे बघत आहेत. आणि असंख्य वेगवेगळ्या भाषा आणि बोलीमध्ये ते म्हणत आहेत,...