घाई
जरा हळुवार चाल ना जीवना,
अजुन भागवायचे आहे काही ऋण,
किती वेगाने पळशील असा,
जगायचेच राहुन गेले कितीतरी क्षण.
सतत अशी धावपळ धावपळ,
आले गेले किती समारंभ आणि सण.
वाऱ्यासारखी नुसती वावरुन गेले,
उत्साहाचा मनावर पडलाच नाही व्रण.
जरा हळुवार चाल ना जीवना,
अजुन भागवायचे आहे काही ऋण,
किती वेगाने पळशील असा,
जगायचेच राहुन गेले कितीतरी क्षण.
सतत अशी धावपळ धावपळ,
आले गेले किती समारंभ आणि सण.
वाऱ्यासारखी नुसती वावरुन गेले,
उत्साहाचा मनावर पडलाच नाही व्रण.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा