पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कळी फुलताना…. कवितेची

 कुठुनशा येतात भावनांच्या लहरी, नी आठवांचे किरण…. फुलवून जातात, उन्मेष मनातील, करीत तुझे स्मरण…. उलगडते अलगद, हळुहळु जराशी, पाकळी पाकळी…. मग खुलुनी येते, फुल बनाया, कवितेची कळी….

मृगजळ

 स्वप्नांच्या मृगजळामागे, धावावे तरी किती? काळ-वेळेची सारी पुंजी, झाली तीथेच रीती! तरी वेडे मन धावते, जरी ऊर फुटलाही, ऊराशीच बांधुन आपल्या, वेड्या आशा काही! #स्वप्न  #काव्य_साद #मी_आणि #मराठी

प्रवास

 भळभळे रक्त रुतता काटे, प्रवास आता, थांबावा वाटे! तरिही केधवा, तुझे हो स्मरण, वेदना मग होई, दूरची आठवण! तुझ्या स्मरणांनी, सुकर हा  प्रवास, सोबतीचा जरी नुसताच आभास! #मी_भाग्यश्री #मी_आणि #काव्य_साद #मराठी #कविता #प्रवास

विद्ध

 जे लीहिले सहज कधी, ते सिद्ध होऊ लागले! मी न झाले तरी माझे, काव्य प्रसिद्ध होऊ लागले! बहरायचे ह्रदय माझे, क्षण एक नजरभेटीने, आज का तुझ्या नजरेने  मन विद्ध होऊ लागले? माझ्याखेरीज ज्या श्वासांना अस्तित्व नव्हते म्हणे, वारेही माझे त्यांना, निषिद्ध होऊ लागले! आघात सोसता सोसता, ह्रदय असे कठीण झाले कणाकणात वेदना तरी मन जीद्द होऊ लागले

का रे, कशासाठी?

 तुझ्याच अस्तित्वाने मी वेष्टित असावे… का रे, कशासाठी? आणि सहमत प्रत्येक गोष्टीत असावे…  का रे कशासाठी? तुझे अस्तित्व झळाळते, मीही तेवते पणतीसम, किंचीत मी वेगळी तर तू कष्टीत असावे… का रे कशासाठी? सोबती मी सखी मी सहचरी मी असताही, रंग सारे तुझेच माझ्याही सृष्टीत असावे… का रे कशासाठी?

नशिब

पाहु दे एकदा तो हात मला, जो हात आहे आज तुझ्या हाती, शोधायची आहे ती भाग्यरेखा, जी माझ्या हातावर नव्हती!

सौहार्द

 तुझ्या मनातील असो  वा माझ्या मनातील, विझायला हवी ही आग आता! पुन्हा एकदा गर्द होऊन, पाना-फुलांसवे, फुलायला हवी ही बाग आता!

बदल

 “वास्तव” बॅंकेत तुझे राहीले नाही खाते. सत्यासोबतचे तुझे, कधीच संपले नाते! खोटी फुले आवडतात आता कारण नसतात त्यांना काटे, आणि खऱ्या फुलांचा गंधही, तुला नकोनकोसा वाटे!