कळी फुलताना…. कवितेची

 कुठुनशा येतात

भावनांच्या लहरी,

नी आठवांचे किरण….

फुलवून जातात,

उन्मेष मनातील,

करीत तुझे स्मरण….


उलगडते अलगद,

हळुहळु जराशी,

पाकळी पाकळी….

मग खुलुनी येते,

फुल बनाया,

कवितेची कळी….

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट