वसंत आला!
कोकीळ कूजन, भ्रमर गुंजन, हा मनरंजन, वसंत आला! रंग उधळण गंध मीसळण, पुष्प संमेलन, वसंत आला! हे नवजीवन, नवसंजीवन, उन्मेषी मन, वसंत आला! हरित होऊन, पालवी लेवून, प्रियास घेऊन, वसंत आला!
नमस्कार! मी भाग्यश्री. इंप्रेशनमुद्रा (impressionmudra.blogspot.com) या माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे. मनावर उमटलेल्या अनुभवांच्या मुद्रांचे हे मूर्त शब्दरुप. मराठी कविता व माझ्या स्फुट लेखनाचे पान... आपल्या या ब्लॉगभेटीच्या अनुभवांची मुद्रा टिप्पणीत नक्की लीहा....! ����