प्रिया तुझ्यासवे....

 

जो मार्ग धरलास तू

तो मार्ग सुखकर होवो

जे योजलेस मनी तू,

ते सारे यशकर होवो.

 

पथ तुझा उज्वल असो,

दिन असो वा रात असो,

साध्य तुझे मंगल असो,

मी साथ असो वा साथ नसो.

 

हरवलीस तू प्रीत जी,

अन् हरला जो विश्वास,

प्रिया तुझ्यासवे असा,

ना करो कोणी प्रयास! 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट