तू फुलव तुझा वसंत!

 

हा मार्ग नव्हे माझा

ही बाळगुन खंत,

पाऊले टाकीशी तू,

घेता जरा उसंत!

 

कर्तृत्व केल्याविना

जीवन वाटे संथ

निरर्थक आयु,

जी नसे कीर्तीवंत

 

धिर मग करी गोळा,

दाखवी जरा हिंम्मत,

बनव तूच तुझा,

तुला साजेसा सुपंथ!

 

मुक्काम येण्याआधी,

रस्त्याला नसे अंत,

ग्रिष्माला दोष नको,

तू फुलव तुझा वसंत!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट