वसंत आला!

कोकीळ कूजन,

भ्रमर गुंजन,

हा मनरंजन,

वसंत आला!


रंग उधळण

गंध मीसळण,

पुष्प संमेलन,

वसंत आला!


हे नवजीवन,

नवसंजीवन,

उन्मेषी मन,

वसंत आला!


हरित होऊन,

पालवी लेवून,

प्रियास घेऊन,

वसंत आला!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट