विद्ध

 जे लीहिले सहज कधी,

ते सिद्ध होऊ लागले!

मी न झाले तरी माझे,

काव्य प्रसिद्ध होऊ लागले!


बहरायचे ह्रदय माझे,

क्षण एक नजरभेटीने,

आज का तुझ्या नजरेने 

मन विद्ध होऊ लागले?


माझ्याखेरीज ज्या श्वासांना

अस्तित्व नव्हते म्हणे,

वारेही माझे त्यांना,

निषिद्ध होऊ लागले!


आघात सोसता सोसता,

ह्रदय असे कठीण झाले

कणाकणात वेदना तरी

मन जीद्द होऊ लागले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट