का रे, कशासाठी?

 तुझ्याच अस्तित्वाने मी वेष्टित असावे…

का रे, कशासाठी?

आणि सहमत प्रत्येक गोष्टीत असावे… 

का रे कशासाठी?

तुझे अस्तित्व झळाळते, मीही तेवते पणतीसम,

किंचीत मी वेगळी तर तू कष्टीत असावे…

का रे कशासाठी?

सोबती मी सखी मी सहचरी मी असताही,

रंग सारे तुझेच माझ्याही सृष्टीत असावे…

का रे कशासाठी?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट