पहिला ‘टक्कल-विजय’
वयाच्या अवघ्या एकोणिसाव्या वर्षी आंद्रे आगासीचे केस गळायला सुरूवात झाली. आपल्या कमी झालेल्या केसांची लाज वाटून ते लपवण्यासाठी आगासीने हेयरपीस घालायला सुरुवात केली. सन 1990 मध्ये 20 वर्षाचा असताना आगासीने त्याच्या पहिल्या ग्रँड स्लॅम, फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश केला. केवळ स्पर्धेत नव्हे तर अंतिम फेरीत. एके ठिकाणी अगासीने लिहिले आहे, ‘अंतिम फेरी आधीच्या रात्री माझ्यावर जवळपास आभाळच कोसळले. अंघोळ करताना सगळेच केस हातात आल्यासारखे वाटले. त्याने त्याच्या भावाला बोलवले. भावाने जवळपास 20 बॉबी पीन वापरून त्याचा हेयरपीस कसा बसा जागेवर बसवला. आगासी पुढे लिहितो की 'अंतिम सामन्यापूर्वी वॉर्मअप करताना मी जिंकण्यासाठी प्रार्थना करत नव्हतो, तर माझ्या केसांना - हेयरपीस कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करत होतो. माझ्या त्या शिल्लक केशरचनेने मला अतिशय भयभीत केले होते. मी अशी कल्पना करत होतो की, प्रत्येक वेळी माझे केस कोर्टवर-मातीवर पडत आहेत. सामना बघणारे लाखो लोक अचानक त्यांच्या टीव्ही च्या जवळ येत आहेत. एकमेकांकडे बघत आहेत. आणि असंख्य वेगवेगळ्या भाषा आणि बोलीमध्ये ते म्हणत आहेत, ‘आंद्रे अगासीचे केस पडले आहेत का?’...' . तो खेळताना अधूनमधून स्टॅन्डमध्ये बघायचा. त्याचे काही चाहते त्याच्यावरील प्रेमाने आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्याच्यासारखीच केशरचना केलेले त्याला दिसायचे. मग त्याची लज्जा भावना अधिकच वाढायची. त्यानंतर तो स्वतःशीच म्हणायचा, ‘मला आंद्रे आगासी बनायचे नाही’. त्याच्या मनातील या विचित्र हेअरपीस फिक्सेशनमुळे तो अंतिम फेरीचा फेवरेट असूनही त्याने तीन सेट गमावले. अर्थातच सामनाही गमावला. पहिले ग्रँड स्लॅमही गमावले.
या प्रसंगानंतर आंद्रे आगासीच्या मैत्रिणीला आंद्रेच्या हेयरपीस विषयीच्या संवेदनशीलतेची अनिवार्य जाणीव झाली. तिने सल्ला दिला की, या केशरचनेपासून आणि हेअरपीसपासून आंद्रे याने बाजूला व्हावे.
आंद्रे आगासीची प्रतिक्रिया होती.....
“अशक्य.”
‘केसांशिवाय किंवा या हेअरपीसखेरीज मला नग्न वाटेल.’
पण मैत्रिणीने त्याला सांगीतले की 'असे केल्याने तुला मुक्त वाटेल'!
या प्रसंगानंतर आंद्रे आगासीच्या मैत्रिणीला आंद्रेच्या हेयरपीस विषयीच्या संवेदनशीलतेची अनिवार्य जाणीव झाली. तिने सल्ला दिला की, या केशरचनेपासून आणि हेअरपीसपासून आंद्रे याने बाजूला व्हावे.
“अशक्य.”
‘केसांशिवाय किंवा या हेअरपीसखेरीज मला नग्न वाटेल.’
आंद्रे आगासी म्हणतो- ‘मी एखाद्या अतुल्य अशा हल्क सारखा बाहेर पडलो’. आंद्रे अंतिम फेरीत पोचला. अंतिम फेरीत त्याने एकही सेट सोडला नाही. अंतिम फेरीपूर्वी आंद्रेने मैत्रिणीला सांगितले ‘तू विचारांती योग्य होतीस. माझ्या केसांचा तुकडा म्हणजे माझ्या बेड्या होत्या.’ ज्या पद्धतीने खेळून आंद्रे आगासीने अंतिम फेरी जिंकली, त्यावरून अनेक जण म्हणाले की ही त्याची तोपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी होती. कारण प्रथम क्रमांकावरच्या पीट सॅम्प्रासवरील हा त्याचा पहिला विजय होता. पण आंद्रेला वाटते कि तो त्याचा पहिला ‘टक्कल-विजय’ म्हणून लक्षात ठेवावा.
बिली ओपनहाईमर यानी या प्रसंगाबद्दल लिहिताना पुढे मानसोपचारतज्ज्ञ फिल स्टुट्झ यांचेही मत मांडलेले आहे. या प्रसंगाचे सर्वात सोपे मानसशास्त्रीय स्पष्टीकरण फिल स्टुट्झ यानी सावलीच्या उदाहरणाने दिलेले आहे. ते म्हणतात "तुमची सावली अथवा छाया हा तुमचा स्वतःचा एक भाग आहे ज्याची तुम्हाला लाज वाटते... तुम्हाला हा स्वतःचा एक सदोष भाग वाटतो की जो तुम्हाला लपवावा लागेल असे तुम्हाला वाटत राहते. आणि एकदा तुम्ही अशा गोष्टी लपवायला सुरुवात केली की इतर लोकांना हे कळले की काय याबद्दल तुम्ही खूप संवेदनशील होतात. तो एक ध्यास बनतो - लोकांना मी कसा वाटतो? ते मला कसे पाहतात? ते माझ्याबद्दल नेमका काय विचार करतात? त्यांना मी आवडतो का? त्यांचे माझ्यावर प्रेम आहे का? इत्यादि. अगासीने म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ज्याची लाज वाटते ती गोष्ट लपवण्याचा तुम्ही जितका जास्त प्रयत्न कराल तितकी तुम्हाला अधिक अधिक लाज वाटेल. तथापि मानसशास्त्रज्ञ स्टुट्झ म्हणतात, “पण सौंदर्य हे आहे की एकदा तुम्ही ज्याची लाज वाटते ती बाब लपवणे थांबवले की तुम्ही आराम करू शकता आणि मग तुम्हाला नवा मार्ग वेग आणि प्रवाह मिळेल... अर्थात जर तुम्ही तुमची सावली लपवणे थांबवले, तरच तुम्हाला प्रवाह मिळेल आणि प्रत्येकाला तेच हवे असते.” आपली सावली लपवणे थांबवल्यानंतर, अगासी प्रवाहित झाला. त्याने लागोपाठ ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आणि 1995 मध्ये जगातील प्रथम क्रमांकाचा टेनिसपटू बनला. आंद्रेने पीट सॅम्प्रासची जागा घेतली, ज्याने सलग 82 आठवडे हे स्थान राखले होते.
यानंतर आपल्याला सुप्रसिद्ध तत्वज्ञ सेनेका यांच्या एका ओळीचा विचार करणे भाग आहे, जोऑन ग्राउंडलेस फियर्स यांना एका पत्रात सेनेका लिहितात, “आपण वास्तविकतेपेक्षा आपल्या कल्पनेत स्वतःला जास्त त्रास देतो.”
It's very true
उत्तर द्याहटवा🙏🏼
उत्तर द्याहटवा