मित्र


 नसतील सोबतीला 

जर वारे वाहणारे,

विझतील आगीचे 

नखरे झेपावणारे!


सगळे माझे सोबती

मित्र आणि सोयरे

प्रत्येक घडीला,

बोलती ‘हो’ स होय रे!


सर्वत्रही अन् सततही

संगतीस असणारे 

न जाणे गरजेवेळी

 लपतात कोठे सारे! 


झेपावू पाहता नभी,

स्पर्षू पाहता तारे,

माझ्या या ज्वालांना

भेटतात विझवणारे!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट