गुलाब- मेसोपोटेमीया, युनान-रोम, येथील संस्कृती असोत, वा बाबर, नुरजहाॅं, नेपोलीयन, पं. जवाहरलाल नेहरु असे राज्यकर्ते असोत, अथवा विरसिंग, शेक्सपियर सारखे साहित्यीक - या सर्वांची आणि सर्वसामान्यांची गुलाबाची आवड सर्वश्रुत आहे. आज या धाग्यात गुलाबाविषयी काही स्फुट- रोमन लोक आपल्या भोजन-कक्षाचे छत गुलाबाच्या फुलांनी सजवत असत. त्यापाठीमागे त्यांची अशी मान्यता होती की भोजनास आलेल्या अतिथींनी गुलाब पाहुन हे लक्षात ठेवावे की भोजनादरम्यान यजमानासह केलेल्या वार्तालापाची वाच्यता बाहेर करु नये. “गुलाबाच्या खाली” जे काही असेल ते ‘गुप्त’ असे समजले जात असे. एक अरबी गुलाबी सुरस कथा अशी आहे की- सर्वच गुलाबांचा रंग पूर्वी पांढरा होता. पण एका रात्री एका बुलबुलची भेट गुलाबाशी झाली आणि बुलबुल प्रेमाच्या रंगात रंगुन गेली. त्या भेटीनंतर बुलबुल चा आवाज़ सुरेल सुरमई झाला. एकदा अचानक गुलाबाचा एक काटा बुलबुलच्या ह्रदयात लागला. त्या लाल रक्तवर्णाला पाहुन त्यानंतर मात्र पांढरा शुभ्र असणारा गुलाब लाल-गुलाब झाला. सुरस कथा सोडून प्रत्यक्ष जीवनाकडे पाहता- दक्षिण सायबेरिया...
खूप छान काव्य
उत्तर द्याहटवा