म्युकोर्मायकाॅसीस
कोविड-१९ च्या आधीही भारत हा म्युकर (फंगस-बुरशी) चे जगातील ७०% (सर्वाधीक) रुग्ण असणारा देश म्हणून माहित होता. सध्या म्युकोर्मायकॉसीस रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे काय कारणे असावीत याचा संक्षीप्त आढावा
१.भारतात मधुमेहाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असणे.
२. मधुमेही रुग्णांचे व्यवस्थापन निट नसणे- उदा. योग्य अंतराने सातत्याने साखरेचे प्रमाण तपासणे व आजार नियंत्रणात राहण्यासाठीची आवश्यक काळजी घेणे
२. स्टिरॉईडस् चा मोठ्या प्रमाणात अव्यवहार्य वापर असणे ज्यामधे संसर्गाच्या सुरुवातीच्याच काळात स्टीराॅईड्स वापरणे, अधीक मात्रेत वापरणे आणि अधीक काळ वापरणे यांचा समावेश होतो.
३ स्टिरॉईडस् च्या बरोबरीने इम्युनोमांड्युलेटर्स प्रकारच्या औषधांचा उदा. Tocilizumab वापर करणे.
४. प्रतिजैविकांचा उदा. अझीथ्रोमायसीन अतीरिक्त वापर करणे, ज्यामुळे सरसकट सामान्यतः आढळणारे जीवाणूही नष्ट होतात.
५. B.1.617 या प्रकारातील विषाणू रोगप्रतिकारक शक्ती कमी करताना आढळतात.
६. अनेक रुग्णांना वैद्यकिय प्रकारच्या आॅक्सीजनऐवजी औद्यागिक वापराकरीता असणारा आॅक्सीजन देण्यात आला आहे.
७. हाॅस्पीटल्स मधील अनियंत्रीत गर्दी, मास्क आणि इतर जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या
संहितांचे पालन न होणे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा