कोविड-१९ सौम्य संसर्ग व प्रतिपिंडे
मानवी इम्यून सिस्टम किंवा रोगप्रतिरोधक संस्था सौम्य प्रमाणात झालेला कोविड-१९ संसर्ग लौकर विसरू शकत नाही असे आढळले आहे.
सौम्य कोविड १९ संसर्गानंतरही अनेक महिन्यांनंतर जेव्हा रक्तातील प्रतिपिंडे (antibodies) यांची पातळी कमी झालेली असते तेव्हांही अस्थिमज्जामधील (bone marrow) रोगप्रतिकारक पेशी कोरोनाव्हायरस विरूद्ध नवीन प्रतिपिंडे निर्माण करुन देण्यास तयार व सक्षम असतात.
मुलत: अल्पायु असणाऱ्या रोगप्रतिकारक पेशी संसर्ग झाल्यानंतर, शरिराचे संरक्षण करणारी प्रतिपिंडे वेगाने तयार करतात. या अल्पायुषी रोगप्रतिकारक पेशी नष्ट झाल्यानंतर, प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होते. परंतु या रोगप्रतिकारक पेशींचा एक समूह दीर्घकाल जगणारा असतो, ज्यांना प्लाझ्मा पेशी म्हटले जाते. या प्लास्मा पेशी पहिला संसर्ग नष्ट झाल्यानंतरसुद्धा प्रतिपिंडे तयार करण्याची राखीव क्षमता बाळगून असतात. अशा पेशींपैकी बहुतेक पेशी अस्थिमज्जा येथे स्थलांतर करतात. सौम्य कोविड-१९ च्या संसर्गानंतर सात महिन्यांनी १९ रुग्णांचे अस्थिमज्जाचे नमुने घेतले गेले. त्यापैकी १५ नमुन्यांमध्ये कोरोनाव्हायरसच्या विरूद्ध प्रतिपिंडे बनवू शकणाऱ्या व दीर्घकाळ जगणाऱ्या प्लाझ्मा पेशी होत्या.
या १५ जणांपैकी पाच जणांची लक्षणे प्रारंभ झाल्यानंतर ११ महिन्यांनी दुसऱ्यांदा अस्थिमज्जा बायोप्सी केली केली आणि त्यावेळीही सार्स-कोविड -२ च्या विरूद्ध प्रतिपिंड बनवू शकणाऱ्या दीर्घकाळ जगणाऱ्या प्लाझ्मा पेशी आढळल्या. संसर्ग निराकरण झाल्यापासून या पेशी अनिश्चित काळासाठी हे कार्य करत राहतील (म्हणजेच या पेशी जगतील आणि उर्वरित आयुष्यात आवश्यक तेंव्हा प्रतिपिंडे तयार करतील).
पण हेच परिणाम मध्यम ते गंभीर कोविड-१९ संसर्गापासुन वाचलेल्या रुग्णांमधे दिसतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
https://go.nature.com/34dYKB2
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा