ध्यास

 ध्यास




नसे प्राप्तीची आस प्रेमास माझ्या,

परी ध्यास तुझा अंतरास माझ्या,

अनुरक्त ह्रदय दाटे आरक्त नेत्री,

अजुनी का उमगेना प्रियकरास माझ्या!?


आठवण येता तुझी जराशी,

अंतरात होते आरास माझ्या,

हूल तुझी चाहुल देते पण,

ऊरात फुलते फुलरास माझ्या!


तूच भेटसी शब्द होऊनी

कंठातील गद् गद् स्वरास माझ्या,

दे ओलावा अन् मृद् गंध जरा

सुकल्या पाऊसधारास माझ्या!


दे कधी धुंद तो गंध श्वासांचा,

तुळशीच्या मंजीरांस माझ्या,

पाहु दे विराण अंगणास या,

एकदा जिवलग यारास माझ्या!


प्राण जरी गेला तरी,

दिसेल कलेवर दारास माझ्या,

तुझीच प्रतिक्षा माझ्यानंतर,

असेल मोकळ्या घरास माझ्या!


भाग्यश्री

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट