का ?
माझ्या वेदनेचा होता जरासा उल्लेख, नाराज तू व्हावे अशी काय आहे मेख? समजावती लोक मला, असु नये इतके भोळे, पण तुला काय झाले, का झुकले तुझे डोळे? फसविले कोणी,
अन् फसली ही बिचारी!
कोणी बोले मला, का तुझी उडते रया सारी?
जखमा माझ्या पाहताना, तो वैद्यही थोड़ा रडला, वेड्या होईन रे मी ठीक, पण चेहरा तुझा का पडला?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा