चारोळी
चारोळी
लोकांशी होतच राहतात,
ओळख, गप्पा, भेट.
स्वतःची स्वतःशीच
कधी ना घडते गाठभेट!
********************
चारोळी
ग्रिष्माचा असो वणवा,
की शिशिराचा शित कहर,
प्रेमाच्या वावरात
सदा ऋतु वसंताचा बहर!
******************
चारोळी
तुझी मी होऊन तरी
काय आता होणार?
संपले अश्रु सारे
आता कसली मी रडणार?
****************
चारोळी
प्रेम म्हणजे एक असे मुक्काम,
ज्याचा कोणताच पत्ता नाही!
तो प्रेमी म्हणजे गुलाम असा,
ज्यावर कोणाची सत्ता नाही!
********************
चारोळी
वाटले ना कधी,
भेटतील असे क्षण…
अदृश्य अश्रु तरी,
मनी आक्रंद रुदन
****************
फुले कसा उधळती नि:स्वार्थी, त्यांचा गंधकोष माहित नाही. सारे काही घेणाऱ्या मानवाला “देण्याचा संतोष” माहित नाही.
*********************
समजावे ज्यांना अंती आधाराची काठी,
ते संधी साधुन घालती खंजीर का पाठी? गेले सरुनी कष्टात तारुण्य आणि शक्ती,
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा