कर्ज
कर्ज
कर्ज कधी ना फीटले माझे,
त्या न जगलेल्या दिवसांचे.
क्षणाक्षणावर व्याज भरले,
अगणीत स्वप्नांच्या ऱ्हासांचे.
काय मी साधणार येथे
मांडून हिशोब त्रासांचे?
जप्त होऊनी जीवनाकरवी,
लिलाव लागले श्वासांचे!
कर्ज
कर्ज कधी ना फीटले माझे,
त्या न जगलेल्या दिवसांचे.
क्षणाक्षणावर व्याज भरले,
अगणीत स्वप्नांच्या ऱ्हासांचे.
काय मी साधणार येथे
मांडून हिशोब त्रासांचे?
जप्त होऊनी जीवनाकरवी,
लिलाव लागले श्वासांचे!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा