एक गाव
आपल्या आत आपले एक गाव असते. तिथे आपले घर असते. एखादे मंदिर असते. बाग असते.
मित्र आणि शत्रुंचीही घरे असतात. भावकी-गावकी असतेच. शिवाय काही गटर आणि उकिरडे पण असतात. आपण मंदिरात किंवा स्वतःच्या घरात थांबायचे ठरवु शकतो. पण बरेचदा आपण गाढवासारखे उकिरड्यावर किंवा डुकरासारखे गटरात असतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा