अलीकडील काळातले अवकाश संशोधनातील महत्वाचे शोध

 अलीकडील काळातले अवकाश संशोधनातील महत्वाचे शोध


१) ग्लोब्युलर क्लस्टर एनजीसी 6397 च्या मध्यभागी शास्त्रज्ञांना एकाच मोठ्या कृष्णविवराच्या अस्तीत्वाची शक्यता दिसत होती. पण हबल ने दाखवले की तीथे मध्यभागीच एका मोठ्या कृष्णविवराऐवजी ऐवजी अनेक लहान लहान कृष्णविवरे दाटीवाटीने  एकत्रीत सहअस्तीत्वात आहेत. 

या शोधानंतर खगोलशास्त्रज्ञांच्या मते कदाचीत या दाटीवाटीने बसलेल्या लहान लहान कृष्णविवरांचे या गोलाकार क्लस्टर्समध्ये विलीनीकरण हे गुरुत्वाकर्षण लहरींचा एक महत्त्वाचा स्त्रोत असू शकतो, स्पेसटाइममधूनही लहरी बनू शकतात.

अलीकडील काळातला कृष्णविवरांशी संबंधीत हा सर्वाधीक  महत्वाचा शोध समजला जातो.


२) दोन आकाशगंगांचे एकमेकीशी विलीनीकरण झाल्यावर त्यांच्या मध्यावरच्या कृष्णविवरांचे काय होते याचे अनेक अभ्यास झाले आहेत, परंतु तीन आकाशगंगा एकत्र आल्यावर कृष्णविवरांचे काय होते हे पद्धतशीरपणे पाहणारे हे अलीकडचे महत्वाचे आणि पहिलेच संशोधन -

एकुण सात वेळा तिन आकाशगंगांचे होणारे विलीनीकरण निरिक्षणात आले आहे.

या सात तिहेरी विलीनिकरणानंतर

_एकच मोठे वाढणारे कृष्णविवर एका ठिकाणी आढळले.

_चार ठीकाणी दोन मोठे वाढणारे कृष्णविवर आढळले.

_एका ठीकाणी तिन कृष्णविवरे आढळली.शेवटच्या एका विलीनिकरणानंतर बाहेर येणारी क्ष-किरणे सुद्धा आढळली नाहीत. This means that none of the supermassive black holes left was rapidly pulling in matter.


ही सर्व कृष्णविवरे एकमेकांपासुन१०००० ते २०००० प्रकाशवर्षे एवढ्या अंतरावर आढळून आली.


३)या सर्व अवकाशातील निरिक्षणात आलेल्या कृष्णविवरांपेक्षा  अधीक उत्सुकता वाटते आहे ती काही हरवलेल्या कृष्णविवरांची.


त्यापैकी एक _


क्लस्टर Abell 2261 च्या मध्यभागीच असणारी एक मोठी आकाशगंगा - जी पृथ्वीपासुन साधारण २.७ बिलीयन प्रकाशवर्षे अंतरावर आहे.  या आकाशगंगेच्या मध्यावर एखादे अजस्त्र कृष्णविवर (that may weigh as much as 3 billion to 100 billion suns) असणे संशोधकांना अपेक्षीत होते.


पण अनेक निरिक्षणानंतरही- हबल नंतर चंद्रा च्या निरिक्षणानंतरही हे कृष्णविवर आढळले नाही. त्यानंतर चंद्रा ऑब्झर्वेटरी ने केलेल्या क्ष-किरणांच्या अभ्यासांती संशोधकांना असे वाटते की एखाद्या (अज्ञात) आकाशगंगांच्या धडक व विलीनीकरणानंतर कदाचीत हे अजस्त्र कृष्णविवर या आकाशगंगेच्या एखाद्या वेगळ्या भागात ढकलले गेले असावे.

शोध सुरुच आहे.


संदर्भ: नासा वेबसाईट

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट