वटवृक्ष
कधीचा तीथे आहे उभा जीर्ण वटवृक्ष,
युगांच्या स्मृतींचा असे संकीर्ण वटवृक्ष.
रेचीत काळासही शाखा-उपशाखांनी,
भू-वरील सम्राट जणु आकीर्ण #वटवृक्ष.
सत्यवान सावित्रीच्या प्रेमाचा साक्षी,
साक्ष ती स्मरण्यात उत्तीर्ण वटवृक्ष.
नवयुगाच्या नवनिष्ठांनी न जाणे कधी,
ह्रदयी होत असे का विदीर्ण वटवृ़क्ष.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा