आयुष्य

काही आशा लहानशा 

अन् स्वप्ने छोटी-मोठी,

यासवे आयुष्य सारे, 

कधी परिक्षा कधी कसोटी.

 

सफाईदार जगण्याची 

ना जमली ती हातोटी,

सरली वर्षे अशीच 

भरले डोळे अर्धी रोटी!


ओझे घेऊन पाठी ,

आणि रिकाम्या पोटी,

तरी हास्य एक,

राहिले सदा ओठी.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट