पीएच् डी. तर माझी पॅशन!

 पीएच् डी. तर माझी पॅशन!


काॅंपिटीशन होती टाईट,

तरी एंट्रन्स ची देऊन फाईट,

मिळवलेच मी ॲडमीशन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


डोळे बारीक पण चष्मा जाड,

गाईडच्या समोर कागदांचे बाड

मग सुरु “टाॅपिक डीस्कशन”,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


गोळा करताना रेफरन्सेस,

कामातून गेले सारे सेन्सेस,

“व्हेअर ईज युवर काॅन्सट्रेशन?”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


सिनाॅप्सीस तयार करता,

सहा महिने त्यात सरता,

“लेट्स चेंज दि डायरेक्शन”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


नविन दिशा नविन शोध,

होईना कसलाच बोध,

“मेक फास्ट युवर ॲक्शन!”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


शेवटी सिनाॅप्सीस तयार झाला,

कमिटीनेही मंजुर केला,

जरा मनाला रिलॅक्सेशन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


चंचल राशी माझी कर्क,

पार पडेना कोर्स वर्क,

तिनदा झाले रिपीटेशन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


खूप होती एक्साईटमेंट,

सुरु केले एक्परीमेंट,

रिझल्ट मिळवणे हेच मिशन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


बरेच अंक अनेक आकडे,

ग्राफ तिकडे आम्ही इकडे,

“नाऊ गो फाॅर पब्लिकेशन”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


रिसर्च पेपरशी घेता टक्कर,

गरगर डोके येई चक्कर,

आॅलमोस्ट सगळेच कन्फ्युजन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


पेपर कसातरी झाला पब्लीश,

बेरकी हसले गाईड ईब्लीस,

“राईट थिसीस ईन कंटीन्यूएशन”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


न कळे राॅंग होता की राईट,

टायटल तर आऊट आॅफ साईट,

कसेबसे केले कंप्लीशन,

पीएच् डी. तर माझी पॅशन!


एकदाचे झाले सबमीशन,

पार पडले प्रेझेंटेशन,

“इट्स टाईम फाॅर सेलीब्रेशन”

पीएच् डी. तर माझी पॅशन!


सळसळती माझी तरुणाई,

वाया गेली पीएच् डी पायी,

आज आहे काॅनवाॅकेशन

पीएच् डी. तर माझी पॅशन!


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट