त्याच्या आयुष्यातला एक दिवस
त्याच्या आयुष्यातला एक दिवस
रोज सकाळी न चुकता
लौकर मी उठतो पहा,
म्हणते बायको वेडी माझी,
उठा आता वाजले दहा!
तरतरी यायला काय हो लागते?
आठ कप एवढाच चहा,
आॅफीसातून तोवर फोन येतो,
“आज तुम्ही घरीच रहा”
तरिही कंटाळा न करता
जातो आॅफीसला नेमाने,
सगळ्या महिला ग्राहकांशी
बोलतो अगदी प्रेमाने!
कधी नुकसान होते का,
जास्ती केलेल्या कामाने?
तरिही सहकारी सतत सांगतात,
‘हळू जरा दमाने!’
आॅफीसच्या कामात आहे
मी अतिशय काटेकोर,
ठेवत नाही मुलाहीजा,
कोणी असो लहान-थोर!
क्वचित कधी मग बाॅस डाफरतो,
‘मत मचाओ इतना शोर’
त्याला काय समजते हो,
तो तर आहे कालचा पोर!
काम माझे शिस्तीत असते,
करत नाही कंटाळा,
काम करतो म्हटल्यावर,
व्हायचाच एखादा घोटाळा!
निस्तरतो माझे मी सारे,
हजार कागदांशी करुन चाळा,
लोक आवर्जुन विचारतात मला,
“कोणती होती तुमची शाळा’!
घरी यायला निघताना
घड्याळ दाखवते साडेअकरा,
खाटीक वाॅचमन बघतो असा,
जणू मी त्याचा बकरा!
“रोजचाच कसला उशिर हा?”
बायको नेहमी करते नखरा!
आई म्हणते “थकलास रे,
जरा आराम कर पाखरा!”
तापट असली बायको तरी,
जेवण करते रुचकर फार,
जेवता जेवता बाबा सांगतात,
समजुतीच्या गोष्टी चार.
बबडीची बडबडगीते,
डोळ्यात माझ्या आणतात तार,
तीच्या आईच्या कुशित जाता,
स्वप्नांवर मी होतो स्वार
mast
उत्तर द्याहटवासुंदर 👌🏼
उत्तर द्याहटवावाह👌👌
उत्तर द्याहटवाamazing but i haven't read it completely
उत्तर द्याहटवाधन्यवाद आमच्या हिला पाठवतो.🙏😊
उत्तर द्याहटवा