काम काम काम

 करुन मेंदूची वेसण सैल जरा,

सोड जू, होई मोकळा बैल जरा,

दराच्या-उंदराच्या शर्यती अती,

विसरुन क्षणभर मना, फैल जरा!


रोजचा कोलू, रोजचाच हा घाणा,

फिरल्यासच वाजती पैसे खणाणा!

कोण कोणाचा गुलाम हे कळेना,

पैसेच बनले, जगण्याचा बहाणा!



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट