कल्पनेतला पाऊस...

 कल्पना


कधीतरी कुठून तरी 

असा पडावा पाऊस,

वाहुन जावे क्रौर्य सारे 

मनामनात साठलेले....!


रुजावेत त्याच आर्द्रतेने

अंकुर काही औदार्याचे

कोणे एके काळी जे,

अंतर्मनात गाडलेले.....!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट