कर्ज

 कर्ज कधी ना फीटले माझे,

त्या न जगलेल्या दिवसांचे.

क्षणाक्षणावर व्याज भरले,

अगणीत स्वप्नांच्या ऱ्हासांचे.

काय  मी साधणार येथे

मांडून हिशोब  त्रासांचे?

जप्त होऊनी जीवनाकरवी,

लिलाव लागले श्वासांचे!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट