मगच....
मगच....
अश्रुंच्या असीम मौनात
ते लपलेले ऐक बोल तू,
मगच मानेल मन तुला!
त्या हास्याच्या लकेरीचा
समजून घे अर्थ खोल तू,
मगच जाणेल मन तुला.
श्वासातले ते हलके उसासे,
जाणून हरवशील तोल तू,
मगच ओळखेल मन तुला.
या साऱ्या वेदना सामावुनी,
बनव काव्याची ओळ तू,
मगच सन्मानेल मन तुला.
https://x.com/BhagyashreeX/status/1846559210915365341
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा