कालही अन् आजही!

 आकंठ तुझ्या मी प्रेमात ... 

कालही अन् आजही

तू तुझ्याच नादात

कालही अन् आजही!


ध्यान तुझे ध्येयात

कालही अन् आजही.

अडचण माझी वेगात,

कालही अन् आजही!


होउन ज़रा मोकळा,

बघ एकदा डोळ्यात,

तुझीच वाट पाहतात,

कालही अन् आजही!


#मराठी

टिप्पण्या

  1. तुज जवळ येण्यास, मी निघालो घरातून
    आले काटे, आल्या अडचणी, मी निघालो पार करून
    सहप्रवासी भेटले, त्यांचा सहवास मी निघालो मागे सारून
    कंठ दाटला, अश्रू आले, मी निघालो डोळे पुसून
    तुला भेटण्यासाठी, मी निघालो जग सोडून

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चाॅकलेट

गुलाब-

अस्वलाची अस्सल गोष्ट